मुंबई : कोरोनाच्या भीतीने मुंबईत मास्कचा काळाबाजार सुरु झाला आहे. एक रुपयाच्या मास्कची २५ रुपयांना विक्री होत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. बाजारात मास्क आणि सॅनिटायजरचा तुटवडा जाणवू लागला आहे. दुकानदारांकडून ग्राहकांची लूट करण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतावरही आता कोरोनाचं संकट घोंघावू लागले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून वैद्यकीय क्षेत्रासमोरही संकट उभे राहिले आहे. मास्क आणि सॅनिटायझर याचा तुटवडा मार्केटमध्ये जाणवत आहे. जर हा संसर्गजन्य आजार भारतात पसरला तर मेडीकल क्षेत्रासमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.


 


कारण या आजाराशी संबंधित आणि इतरही काही आजारांच्या औषधांबाबतचा काही कच्चा माल भारतात आयात होऊ शकलेला नाही. तर भारतात औषधांचा तुटवडा जाणवू नये म्हणून सरकारनं काही औषधांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.  



कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्यतील यंत्रणाही सज्ज असल्याची माहिती आरेग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोनापासून वाचण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मास्कचा, औषधांचा राज्य सरकारकडे योग्य पुरवठा असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत दिली. संच कोणत्याही अफवांना बळी पडू नका, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केलंय. अफवा पसरवणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे. 

0