मुंबई : कोरोनाचे संकट कायम आहे. जून महिन्यात कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढू शकतो, अशी भीती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाचा संकटाचा सामना करण्यासाठी लाखभर खाटांची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली. त्याचवेळी वानखेडे स्टेडियमवर क्वारंटाईन जम्बो सेंटर उभारणार येणार आहे. त्यादृष्टीने मुंबई महापालिकेने तयारी सुरु केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनला पत्रही लिहिलेले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 दरम्यान, काल मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलातील विशेष कोविड रुग्णालयाची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडून पाहणी करण्यात आली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरेगावातल्या कोरोना केअर सेंटरला भेट दिली. त्याचवेळी वानखेडे स्टेडियमवर क्वारंटाईन जम्बो सेंटर उभारण्याची संकल्पा ठेवण्यात आली.


बीएमसीने वानखेडे स्टेडियमवर कोरोनव्हायरसचा मुकाबला करण्यासाठी कोविड -१९ रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी जागा मागितली आहे. याबाबत एमसीएला पत्र पाठविण्यात आले आहे. त्यानुसार येथे ५०० खाटांसाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.


बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ने शुक्रवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) वानखेडे स्टेडियमची काही सुविधा वापरण्याबाबत नोटीस बजावली आहे. ‘ए’ प्रभागातील सहाय्यक महानगरपालिका आयुक्त चंदा जाधव यांनी जारी केलेल्या पत्रात "हॉटेल, लॉज,क्लब,कॉलेज,प्रदर्शन केंद्रे, वसतिगृह, विवाहगृह, जिमखाना ,मेजवानी हॉल तातडीने  देण्यात यावेत अशी विनंती केली आहे.


राज्यात शुक्रवारी कोरोनाचे १ हजार ५७६ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या २९ हजार १०० वर गेलीय. तर शुक्रवारी २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत काल दिवसभरात ९३३ नवे आढळले, तर ३४ जणांचा बळी गेला. त्यामुळे मुंबईतल्या बळींचा एकूण आकडा ६५५ झाला आहे. दरम्यान काल दिवसभरात राज्यात ५०५ रुग्णांना घरी पाठवण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ६ हजार ६५४ वर पोहोचला आहे.