कोरोनाचा धोका : राज्य मंत्रिमंडळाची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे
कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसागणिक वाढत आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.
मुंबई : कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसागणिक वाढत आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. कोरोनाचे संकट वाढत असल्याने त्यावर भविष्यात काय उपाय-योजना करावयाच्या आणि त्याबाबत नियोजन करण्याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंत्रीमंडळ बैठक होत आहे.
कोरोनाचा धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तोंडाला मास्क लावून स्वत: गाडी चालवली. मुख्यमंत्री वर्षावर व्हिसीद्वारे बैठक घेत आहेत. त्यांच्याबरोबर छगन भुजबळ, जयंत पाटील, राजेश टोपे, अनिल परब, आदित्य ठाकरे उपस्थित आहेत.
काही मंत्री मंत्रालयात बैठकीला बसले आहेत, त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील, सुभाष देसाई, नवाब मलिक, अस्लम शेख आहेत . तर जिल्ह्यात असलेले मंत्री आपापल्या जिल्ह्यात व्हिसीद्वारे बैठकीत सहभागी झाले आहेत. धनंजय मुंडे बीडवरून, अमित देशमुख लातूरवरून, बुलढाण्याहून राजेंद्र शिंगणे असे सर्व मंत्री व्हिसीद्वारे बैठकीत सहभागी होणार आहेत. १७ मार्चनंतर होतेय मंत्रीमंडळाची बैठक होत आहे.