मुंबई : कोरोना विषाणूचा प्रभाव सतत वाढत आहे आणि कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. अशीच एक ताजी घटना पुढे आली आहे ती म्हणजे मुंबईतील कांदिवली येथील साई धाम मंदिराची आहे. येथे मंदिरातील कोरोनामधील १२ कर्मचाऱ्यांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाची चिंता वाढली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यावेळी देशभरात लॉकडाऊनची घोषणा झाली तेव्हापासून मंदिर प्रशासनाच्यावतीने गोरगरीब आणि गरजू लोकांना अन्न वाटप केले जात होते, तसेच मंदिरातील लोकांना अन्नही दिले जात होते. दरम्यान, मुंबईत झपाट्याने कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. यापार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता.


त्यानंतर दोन दिवसांपूर्वी, मंदिर प्रशासनाने आपल्या १७ कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी केली. त्यानंतर १७ पैकी १२ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आल्यानंतर मंदिर परिसर आणि आजूबाजूच्या भागात भीतीचे वातावरण आहे.


सध्या, बीएमसीने आता अशा १२ लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोध घेण्यास सुरुवात केली आहे. कोरोनामुळे संक्रमित लोकांच्या बाबतीत राज्याची राजधानी मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे. धारावी, वरळी, चेंबूर, मानखुर्द, परळ आदी ठिकाणचे काही भाग हे हॉटस्पॉट ठरले आहेत. याठिकाणी विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.