मुंबई : कोरोना व्हायरस (Corona Virus) पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अनेक लोकं एँटीबायोटिक (Antibiotics) औषधांचा वापर करतात. मात्र हीच औषध आपल्या शरीराला घातक आहेत. या एँटीबायोटिकच्या अधिक वापरामुळे एका गंभीर आजाराचे शिकार होण्याची दाट शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने याबाबत चेतावणी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

WHO ने दिलेल्या चेतावणीनुसार, एँटीबायोटिक्स (Antibiotics) घेतल्यामुळे गोनोरिया (Antibiotics)चे प्रकार वाढत असल्याचा धोका निर्माण झाला आहे. कोरोना व्हायरसपासून बचाव होण्यासाठी अद्याप कोणतीच लस आलेली नाही. मात्र सुरूवातीच्या काळात एँटीबायोटिकचा वापर केला गेला. एका संशोधनात असे समोर आले की, कोरोनावर श्वासाच्या त्रासासाठी घेतलं जाणारं (Azithromycin)एजिथ्रोमाइसिन या एँटिबायोटिक सर्वाधिक वापरण्यात आली. 


WHO च्या रिपोर्टनुसार, आवश्यकतेपेक्षा या औषधांवर अवलंबून राहिल्यामुळे सुपर गोनोरिया म्हणजे गुप्तरोगाचे प्रमाण वाढत असल्याची माहिती मिळाली आहे. 



काय आहे गोनोरिया? 


हा आजार नीसीरिया गोनोरिया (Gonorrhoea) नावाच्या बॅक्टेरीयामुळे होते. असुरक्षित शरीर संबंध (Unprotected Sex),ओरल सेक्स (Oral sex) आणि अनैसर्गिक सेक्स (Unnatural sex) मुळे याचे संक्रमण पसरते. मात्र धोका असा आहे की, यावर उपचारासाठी वापरली जाणारी एँटिबायोटिक अप्रभावी होत आहे.