मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, राज्यात ५ लाख ४६ हजार रूग्ण आहेत. रिकव्हरी रेट ८८ टक्के इतका आहे. रूग्णवाढीचा दर ०.८ टक्के आणि देशाचा दीड टक्के आहे. रूग्णदरात देशात आपले राज्य ३१ वे आहे. काही जिल्ह्यात कमी होत आहे. परंतु कोल्हापूर सांगली सातारा व बीडमध्ये रूग्ण वाढत आहेत.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी परिस्थिती सुधारत असल्याचे कौतुक केले व समाधान व्यक्त केले. केंद्र सरकारकडून लसीबाबत योग्य नियोजन होत नाही. भारत सरकारचा लसीकरण कार्यक्रम असल्यानं अपेक्षा व्यक्त करतोय. त्वरीत २० लाख दुस-या डोससाठी डोसेस हवे आहेत. आयात करणा-या लशींसाठी एक राष्ट्रीय धोरण असायला हवे. वेगवेगळे दर टाळण्यासाठी हे हवे. देशस्तरावर एकच टेंडर काढावे, जेनेकरून कमी किंमतीत लस मिळतील.'


'राज्यात १५०० वर म्युकरमायकोसीसचे रूग्ण आहेत. यासाठी लागणारे इंजेक्शनचा कोठा वाढवून द्यावा. तसंच उत्पादन वाढवण्याच्या सूचना द्याव्यात व त्याची किंमत कमी झाली पाहिजे अशी मागणी केंद्राकडे केली. या आजारासंदर्भात जनजागृती व्हायला हवी. 6 लाख रेमडेसिविरसाठी ग्लोबल टेंडर काढले आहे. परंतु आयातीसाठी डिजीसीआयची परवानगी लवकर मिळावी. 


'लॉकडाऊन 1 जूनपर्यंत वाढवला असून यात इतर राज्यातून येणा-या लोकांसाठी चाचणी सक्तीची केली आहे. दूध विक्रीसाठी सकाळी ७ ते ११ चा वेळ दिला आहे. मिशन ऑक्सीजन व पेडियाट्रिक वॉर्डची माहिती इतर राज्यांना व्हिसीमध्ये दिली. १६ लाख कोविड लशी विकत घेतल्या. त्यातील ५ ते ५.५ लाख लशी १८ ते ४४ वयोगटासाठी दिल्या गेल्या आहेत. ऊर्वरीत लशी ४५ वरील व्यक्तींना दुस-या डोससाठी वापरू.'


'राज्यात मृत्यूदर वाढ ही दु:खद बाब आहे. कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याकरता टेली आयसीयू सुरू करणार आहोत. उशिरा दाखल झालेल्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक. अंगावर दुखने काढू नका. डब्बल मास्क घातल्याने ऑक्सीजन कमी होत नाही. ग्लोबल टेंडर बीएमसीनं काढले आहे. यामुळं इतर लशींची माहिती मिळेल. केंद्राच्या काही गोष्टींची परवानगी आवश्यक असते. केंद्राने दिलेल्या सूचना आम्ही अंमलात आणतो. जर केंद्राने कोवीशील्डसाठी नव्याने ८ ते १२ आठवड्यांचा कालावधी दिला तर त्याची अंमलबजावणी करू.


'मृत्यूदराच्या बाबतीत १००% सुधारणा आपण करणार आहोत. मृत्युदराबाबत सुधारणा करण्याबाबत टाईम बाऊंड कार्यक्रम देण्यात आला आहे. ज्या जिल्ह्यात मेडिकल कॉलेजेस आणि इतर मोठ्या वैद्यकिय सुविधा नाहीत त्या जिल्ह्यात टेली आयसीयु युनिट सुरु करणार आहोत. १८ जिल्ह्यांमध्ये टेली आयसीयु सुरु करणार आहे.' अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.