मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत असताना धारावीतून आली मोठी अपडेट
Mumbai Corona Update : राज्यात कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत आहे. दरम्यान, पहिला आणि दुसऱ्या लाटेत ज्या धारावीत (Dharavi ) कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात आले होते. त्याच धारावीत कोरोनाचा (Covid-19 Update) धोका वाढला आहे.
मुंबई : Mumbai Corona Update : राज्यात कोरोनाचा (Coronavirus) धोका दिवसागणिक वाढत आहे. मोठ्या शहरातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता मुंबईतही कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आज संध्याकाळी मुंबईत मिनि लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, पहिला आणि दुसऱ्या लाटेत ज्या धारावीत (Dharavi ) कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात आले होते. त्याच धारावीत कोरोनाचा (Covid-19 Update) धोका वाढला आहे. त्यामुळे कोरोना चाचणीवर भर देण्यात आला आहे. (The number of corona positives in Dharavi is increasing.)
मुंबई पालिकेचे जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी माहिती देताना सांगितले की, धारावीची चिंता नक्कीच वाढली आहे. दाटीवाटीचा भाग आहे. तसेच परराज्यातून येणारे ही नागरिक खूप आहेत. अनेकांनी अद्याप पहिलाच डोस घेतला नाही. असे लोक डोस घ्यायला पुढे येत आहेत. धारवीकरांना आवाहन करण्यात आले आहे, लसीकरण करा.
धारावीत काल 1150 टेस्ट करण्यात आल्या त्यात 107 नव्या रुग्णांची नोंद झाली तर सध्या एकूण 444 रुग्ण आहेत. 107 पैकी 80 जण रुग्णालयात दाखल झालेत आहेत. आज सुमारे 135 नवे रुग्ण येण्याचा अंदाज आहे. धारावीत दोन्ही डोस पूर्ण असलेले 60 टक्के नागरिक आहेत. तर 70 ते 80 टक्के नागरिकांचा पहिला डोस झाला आहे. त्यामुळे येथे त्रिसूत्रीचं पालन करावंच लागणार आहे, अशी माहिती किरण दिघावकर यांनी दिली.