मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसनं अक्षरश: धुमाकूळ घातलाय. त्याचा भारतातही शिरकाव झालाय. भारतात दोघांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताची आर्थिक राजधानी मुंबई सज्ज नसल्याचे दिसून येते आहे. मुंबईसारख्या शहरात कस्तुरबा आणि सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये क्वारांटाईन सेंटर उभारण्यात आलेत. मात्र याठिकाणी पुरेशी सुविधा उभी करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचे दिसते आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये अत्यंत अस्वच्छता असल्याचं समोर येतंय. याठिकाणी झी २४ तासनं रिऍलिटी चेक केलाय. कोरोनाबाधित रुग्णांवर अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचाराची सोय करण्यात आली. मात्र या रुग्णालयात अतिशय वाईट व्यवस्था असल्याचे इथं कोरोना टेस्टसाठी आणण्यात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया आहे. 
जर्मनीनीहून परतलेल्या एका १८ वर्षीय मुलाला या रुग्णालयात टेस्टसाठी आणण्यात आलं. त्याच्या आईनं झी २४ तासला रुग्णालयात कसे ज्येष्ठ नागरिकांचे आणि लहान मुलांचे हाल होतायत याची माहिती दिली.


महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी चार नवे रूग्ण, नवे तीन रूग्ण मुंबईत, एक नवा रूग्ण नवी मुंबईत सापडला आहे. राज्यातल्या कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या वाढतच आहे. तर देशातल्या १३ राज्यात पसरला कोरोना पसरलाय. राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३७ वर गेलीय. राज्यातल्या १० शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले.