मुंबईतल्या `या` 4 वॉर्डमध्ये झपाट्यानं वाढतोय कोरोना
रुग्णसंख्येत दररोज 10 ते 15 टक्के वाढ
मुंबई : मुंबईतील 4 वॉर्डमध्ये झपाट्यानं कोरोना वाढतोय. चेंबुर, टिळक नगर, बोरिवली, मुलुंड, अंधेरी याठिकाणी रुग्णसंख्या वाढल्याचं दिसून येतंय. रुग्णसंख्येत दररोज 10 ते 15 टक्के वाढ होताना दिसतेय.
चेंबुर, टिळक नगर आणि मुलुंड भागात रुग्णसंख्या वाढीचा दर सर्वाधिक 0.26% एवढा आहे. 98% रुग्णसंख्या वाढीच्या केसेस इमारतींच्या भागातून येतायत. त्यामुळेच नियमांच्या कठोर अंमलबजावणीसाठी मुंबई महापालिकेच्या निवासी इमारतींना नोटीस पाठवण्यात आल्यायत.
मुलुंडमध्ये सर्वाधिक 170 इमारती सील करण्यात आल्यायत. तर एम वेस्ट वॉर्डमध्ये जवळपास 550 इमारतींना नोटिसा देण्यात आल्यायत. इमारतींमध्ये बाहेरुन येणा-या व्यक्तींचं स्क्रीनिंग करण्याबाबत तसंच कमीत कमी लोकांना प्रवेश देण्याच्या सूचनाही देण्यात आल्यायत.
तसंच सार्वजनिक ठिकाणं, विवाह कार्यालयं, बाजारपेठांच्या जागा याठिकाणीही कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात येतेय. मुंबईत सध्या सक्रिय कंटेंटमेंट झोनची संख्या 76 एवढी आहे.