चिंताजनक | राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची एन्ट्री, पहिल्यांदा आढळला रुग्ण
Corona Omicron New Varient : महाराष्ट्रात नव्या व्हेरिएंटचे रुग्णांचं निदान झालं आहे. राज्यात ओमायक्रॉनच्या 2 नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत.
मुंबई : अतिशय चिंताजनक अशी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या रुग्णांचं निदान झालं आहे. राज्यात ओमायक्रॉनच्या 2 नव्या सब व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. बीए 4 आणि बीए 5 या व्हेरिएंटचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता राज्य सरकार आणि आरोग्य विभागाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. इतकंच नाही तर दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. (corona omicron sub ba 4 and 5 variants detected in maharashtra state)
बीए 4 या व्हेरिएंटचे 4 आणि बीए 5 या व्हेरिएंटच्या 3 रुग्णाचं निदान झालं आहे. बीए 4 या व्हेरिएंटचे चारही रुग्ण पुण्यातील असल्याची माहिती मिळत आहे. चिंताजनक बाब म्हणजे हे व्हेरियंट जास्त संसर्गजन्य असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय.