मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या ७७ लाख ६ हजार ९४६ वर पोहोचली आहे. त्यापैकी ७ लाख १५ हजार ८१२ रुग्णांवर उपचार सुरू असून गेल्या २४ तासांत ५५ हजार ८३८ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे देशात दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. तर मुंबईत देखील कोरोना रुग्ण दुपटीचा वेग १०० दिवसांवर आला आहे. ही बाब दिलासा देणारी असली तरी प्रत्येकाला सावधान राहण्याची नितांत गरज आहे. बुधवारी रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने १०२ दिवसांचा टप्पा पहिल्यांदा गाठला आहे. मुंबईत रुग्ण वाढीचा वेग १.२२ टक्क्यांवरून ०.६९ टक्क्यांवर पोहोचला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, चेस द व्हायरस, मिशन झिरो, ट्रेसिंग-ट्रॅकिंग-टेस्टिंग-ट्रीटिंग शिवाय 'माझा कुटुंब माझी जबाबदारी' आणि पोलिसांच्या मदतीने राबवण्यात आलेल्या उपाययोजनांना अखेर यश मिळत असल्याचं चित्र समोर आहे. २५ ऑगस्ट मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ९३ दिवस होता. त्यानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे तो ५४ दिवसांवर पोहोचला होता. 


आता जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार १० ते २१ ऑक्टोबरमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १०२ दिवस असा नोंदवण्यात आला आहे. मुंबईतील २४ विभागांपैकी ३ विभागांत  रुग्णदुपटीचा वेग १५० दिवसांपेक्षा जास्त आहे. दरम्यान रुग्ण दुपटीचा वेग मुंबईत मंदावत असला तरी नेमून दिलेले नियम पाळण्याची नितांत गरज आहे. 


'मिशन झिरो' हेच ध्येय असल्याचं सांगत मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी म्हटलं की, 'मिशन झिरो' हेच आपलं ध्येय आहे. ते गाठण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहेत.