महाष्ट्रातील सर्वात दुर्गम मतदान केंद्र; निवडणूक कर्मचाऱ्यांनी तासभर पायी चालत सर केलं रायरेश्वर

 रायरेश्वर मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी लोखंडी शिडीचा वापर करून मतदान पथकाने एक तास पायी प्रवास केला. 

May 06, 2024, 19:42 PM IST

Maharashtra Lok Sabha Election 2024 : लोकशाहीचा पाया मजबूत करणारी कामगिरी निवडणूक कर्मचाऱ्यांनी केली आहे. मतदान  केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी तासाभराची पायपीट करुन निवडणूक कर्मचाऱ्यांनी पुण्यातील रायरेश्वर सर करावा लागला.

 

1/7

महाष्ट्रातील सर्वात दुर्गम मतदान केंद्र महाष्ट्रात आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांना ट्रेकिंगकरुन या मतदान केंद्रापर्यंत पोहचावे लागले.  

2/7

जिल्ह्यासह राज्याच्या इतरही भागात मतदान कर्मचारी अशा विविध आव्हानांचा सामना करीत नागरिकांना या उत्सवात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.  

3/7

प्रत्येक पात्र मतदाराला लोकशाहीच्या या महाउत्सवात सहभागी होता यावं यासाठी कर्मचारी घेत असलेली ही  मेहेनत खरंच कौतुकास्पद आहे.  

4/7

भोरपासून 30 किलोमीटर अंतरावरच्या या मतदान केंद्रावर जाण्यासाठी, रायरेश्वरच्या पायथ्यापर्यंत वाहनानं जाता येतं. त्यानंतर एक तास पायी वाटचाल करून लोखंडी शिडीच्या मदतीनं या मतदान केंद्रापर्यंत पोहोचता येतं.   

5/7

रायरेश्वर पठारावर हे मतदान केंद्र आहे. विशेष म्हणजे रायरेश्वर हे पुण्यातील सर्वांत उंचावरचं मतदान केंद्र असून, 160 मतदारांसाठी या मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.   

6/7

या भागातल्या मतदारांना आपला मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी, निवडणूक कर्मचारी रायरेश्वरची लोखंडी शिडी चढून तब्बल एक तास पायी प्रवास करुन मतदान केंद्रावर पोहोचले.

7/7

पुण्यात बारामती लोकसभा मतदारसंघात भोर विधानसभा मतदारसंघ येतो. या भोर विधानसभा मतदारसंघात रायरेश्वर या दुर्गम मतदान केंद्राचा समावेश होतो.