मुंबई : राज्यात दिवसागणिक वाढणारा कोरोनाग्रस्तांचा आकडा भारतासाठी मोठी चिंतेची बाब ठरत आहे. शनिवारी दिवसभरात तब्बल 1606 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज एका दिवसांत 67 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 1135 जणांचा मृत्यू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज दिवसभरात 524 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत राज्यात एकूण 7 हजार 88 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 30 हजार 706 इतकी झाली आहे. 


'जून अखेरपर्यंत...' कोरोनाबाबत आरोग्यमंत्र्यांची धक्कादायक माहिती


एकट्या मुंबईत आतापर्यंत 18 हजार 555 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुंबईत आतापर्यंत 696 जण कोरोनामुळे दगावले आहेत. 


ठाणे 205, ठाणे मनपा 1416, मुंबई मनपा 1282, कल्याण-डोंबिवली मनपा 502, उल्हासनगर मनपात 100 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 


पुणे 189, पुणे मनपा 3302, पिंपरी-चिंचवड मनपा 156 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मालेगावमध्ये 667 जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. रायगड 218, पालघर 50 तर वसई-विरार मनपात 340 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मीरा-भाईंदरमध्ये 283 जण कोरोनाबाधित आढळले आहेत.


कुर्ल्यात कोरोनाचा धोका वाढला; पालिकेकडून 'हा' परिसर सील


सिंधुदुर्गात 10 तर रत्नागिरीमध्ये 91 कोरोना रुग्ण सापडले आहेत. 


सर्वाधिक कमी रुग्ण वर्धा 2, चंद्रपूर, भंडारा, गोंदियामध्ये एक कोरोनाबाधित आढळला आहे. 


सध्या राज्यात 3 लाख 34 हजार 558 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 17 हजार 48 लोकांना संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे.