मुंबई : कोरोनाचा फैलाव झोपडपट्टीत झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत असताना आता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाच कोरोना होत असल्याने अधिक चिंता वाढली आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करताना आरोग्य कर्मचाऱ्यांनाच बाधा होत आहे. मुंबई शहरात आज सकाळपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये तब्बल १८ ने वाढ झाली आहे. भाटिया रुग्णालयात १० कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. 


धारावीत रुग्णांची संख्या वाढतेय



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतल महत्वाचा भाग दादरमध्ये आणखी दोन तर माहिममध्ये आणखी एक कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. शिवाजी पार्कमधील ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक महिलेला तर ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला कोरोनाची लागण झाली आहे. माहिममध्येही एका ५५ वर्षीय व्यक्ती कोरोना झाला. त्याचप्रमाणे कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. 



३५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण


धारावीत कोरोनाचे ५ रुग्ण वाढलेत. मुंकुंदनगर परिसरातील रुग्णांची संख्या १४वर पोहोचली आहे. तर धारावीत कोरोना रुग्णांची एकूण संख्या ६०वर पोहोचली आहे. ताडदेव इथल्या भाटिया रूग्णालयातील आणखी १० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. या रूग्णालयातील एकूण ३५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 


कोरोना रुग्णाची आत्महत्या


दरम्यान, कोरोनाग्रस्त महिला रूग्णाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नायर रूग्णालयात २९ वर्षीय कोरोनाग्रस्त महिला रूग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केली. नायर रूग्णालयाच्या बाथरूममध्ये महिलेने पहाटे पावणेचार वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली.