मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईला (Mumbai)Tauktae या चक्रीवादळाचा तडाखा (Cyclone Tauktae) बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून दोन दिवस कोरोना लसीकरण Corona Vaccination) थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. धोक्याच्या इशाऱ्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या (BMC)अधिकाऱ्यांनी कोरोना लसीकरण अभियान पुढील दोन दिवस तहकूब करण्याचा निर्णय घेतला आहे, तशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 बीएमसीने (BMC)शुक्रवारी ट्वीट करुन दोन दिवस लसीकरण रद्द केल्याची माहिती दिली. आता त्यानुसार मुंबईत लसीकरण मोहीम 15 आणि 16 मे पर्यंत तहकूब करण्यात येणार आहे. मुंबईचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, 'Tauktae' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेतली असून लसीकरण थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


260 ठिकाणचे लसीकरण थांबविले



मुंबईत एकूण 260 लसीकरण केंद्रे आहेत. दुसरीकडे हवामान खात्याने 'Tauktae' चक्रीवादळ मुंबईच्या अगदी जवळून जाऊ शकते, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे या 260 लसीकरण केंद्रावर कोणतेही काम होणार नाही. ही केंद्र बंद ठेवण्यात येणार आहेत.


रेड अलर्ट जारी


दरम्यान, लक्षद्वीपच्या (Lakshadweep) समुद्रात तयार झालला कमी दाबाचे पट्टा अधिक सक्रीय होणार असून त्यामुळे चक्रीवादळामध्ये  (Cyclone) बदलले जाऊ शकते. चक्रीवादळाची स्थिती शनिवार  15 मे ते आगामी मंगळवार 18 तारखेदरम्यान राहणार आहे. गुजरातशिवाय रत्नागिरी, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडेल.


गुजरात किनाऱ्यावर चक्रीवादळ (Cyclone) धडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, या चक्रीवादळामुळे लक्षद्वीप समुद्र भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन रत्नागिरी, (Ratnagiri) आणि सिंधुदुर्गात (Sindhudurg) वादळासह जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्याचवेळी जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याने मासेमारी करण्यासाठी कोणीही समुद्रात जाऊ नये, असा इशारा जिल्हा प्रशासनाने मच्छिमारांना दिला आहे. दरम्यान, 'ऑरेंज अ‍ॅलर्ट'चाही इशारा देण्यात आला आहे.


राज्यात अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारीही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकणात शनिवारीही पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यातही शनिवारपासून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा सुरुवात होण्याचा अंदाज आहे.