मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ९७वर पोहोचला आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेली ही संख्या लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात कर्फ्यूची घोषणा केली आहे. या कालावधीमध्ये फक्त अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही काही मौजमजेची वेळ नाही. तरीही नागरिक रस्त्यावर काय सुरु आहे, हे बघण्यासाठी बाहेर पडतात. आज सकाळपासून रस्त्यांवर अनेक वाहने विनाकारण बाहेर पडल्याचे दिसून आले. त्यामुळे आम्हाला आता नाईलाजाने राज्यभरात संचारबंदी लागू करावी लागत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.



एकीकडे मुख्यमंत्र्यांनी कर्फ्यूची घोषणा केल्यानंतरही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबईच्या रस्त्यावर काही लोकं अनावश्यक घराबाहेर हिंडताना आढळली. या लोकांना समज देऊन घरी पाठवावं लागतं, ही खेदाची बाब आहे, असं अनिल देशमुख म्हणाले. कोरोनाचं गांभीर्य लक्षात घ्यायला हवं. जे कायद्याचं उल्लंघन करतील, अशांवर पोलीस कठोर कारवाई करतील, असा इशारा अनिल देशमुख यांनी दिला आहे.