मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जनतेला कोरोनाच्या संकटाची कल्पना आली आहे. कोरोनाचा धोका खूप मोठा आहे. त्यामुळे नागरिकांनो घरातच राहा असं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे. केंद्रसरकारकडून एसी बंद करण्याची सूचना आली आहे. त्यामुळे, चला हवा येऊ द्या म्हणत, मुख्यमंत्र्यांनी एसी बंद करा, घरात मोकळी हवा येऊ द्या, खिडक्या उघड्या ठेवा असं आवाहन जनतेला केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना म्हणजे जागतिक युद्ध आहे. कोरोनाचा धोका असला तरी अजिबात काळजी करु नका. परंतु घराबाहेर पडू नका. गरजेच्या वस्तू आणण्यासाठी, गरज असेल तरच बाहेर पडा, बाहेर जाताना एकट्यानेच जा. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरु राहणार आहे. या जीवनावश्यक सेवा बंद केल्या नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. 



हातावर पोट असणऱ्यांना, अशा कर्मचाऱ्यांचं किमान वेतन थांबवू नका, संकटाच्या काळात माणुसकीच्या धर्माने वागण्याचं आवाहन त्यांनी खासगी कंपन्यांना केलं आहे. 


हा लढवय्या महाराष्ट्र आहे. आपण जिंकणारच आहोत, आपल्याला जिंकायचंच आहे. गुढीपाडवा साजरा करायचा आहे. पण आपल्या या संकटावर मात करुन विजयाची गुढी उभारायची असल्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय.