मुंबई : कोरोना व्हायरसच्या संकटात राज्य सरकारने बंधपत्रित (बॉण्डेड) डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचसोबत बॉण्डेड डॉक्टर आणि कंत्राटी डॉक्टर यांचे मानधनही समान केले जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे. डॉक्टरांच्या मानधनात वाढ केल्यामुळे कोरोना लढाईल यश मिळेल, तसंच डॉक्टरांनाही प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाढीव मानधनानुसार आता आदिवासी भागातील बंधपत्रित डॉक्टरांना ६० हजारांच्याऐवजी ७५ हजार रुपये, तसंच आदिवासी भागातील बंधपत्रित तज्ज्ञ डॉक्टरांना ७० हजारांऐवजी ८५ हजार रुपयांचं मानधन मिळेल. इतर भागातील एमबीबीएस डॉक्टरांना ५५ हजारांऐवजी ७० हजार रुपयांचं मानधन मिळेल. तसंच इतर भागातील तज्ज्ञ डॉक्टरांना ६५ हजारांऐवजी ८० हजार रुपये मानधन देण्यात येईल. 


राज्य सरकारची केरळकडे प्रशिक्षित डॉक्टर आणि नर्सची मागणी, देणार एवढं मानधन