मुंबई : शेअर बाजाराला कोरोनाचा जबरदस्त फटका बसला आहे. एका दिवसात पाच लाख कोटी बुडाले आहेत. १४४२ पेक्षा जास्त अंकांनी शेअर बाजार कोसळला आहे. चीनमध्ये अक्षरशः हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसची दहशत मुंबई शेअर बाजारातही पाहायला मिळाली. शुक्रवारी आठवड्याचा शेअर बाजार बंद होताना, एका दिवसात बाजारात तब्बल साडे ५ लाख कोटी बुडाले. तर १ हजार ४४८ अंशांनी शेअर बाजार कोसळला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये २८००हून अधिक बळी गेला आहे. भारतात आतापर्यंत फक्त तीन रुग्ण सापडले असले, तरी कोरोनाचा ताप भारतीय शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांनाही चढला आहे. जागतिक बाजारातील ऐतिहासिक घसरणीच्या पार्श्वभूमीवर उघडलेल्या भारतीय शेअर बाजारात आज गुंतवणूकदाराचं जवळपास साडे पाच लाख कोटी रुपयांचे नुकसान केले आहे.