धक्कादायक! मुंबईत आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन
मुंबईमध्ये युकेचा नवा कोरोना स्ट्रेन आढळला असून आतापर्यंत ही रुग्णसंख्या 4वर पोहोचली आहे.
मुंबई: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचं थैमान वाढत आहे. अमरावती, वर्धा, हिंगोली परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला आहे.
मुंबईमध्ये युकेचा नवा कोरोना स्ट्रेन आढळला असून आतापर्यंत ही रुग्णसंख्या 4वर पोहोचली आहे. 90 नमुन्यांपैकी एका व्यक्तीच्या अहवालात हा स्ट्रेन सापडला आहे. जिनोम सिक्वेन्सिंगनंतर एका रुग्णामध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला. मुंबईत आतापर्यंत यूके स्ट्रेनच्या 4 केसेस झाल्या आहेत.
दिल्लीच्या प्रयोग शाळेत जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आलेल्या 90 पैकी एका सँपलमध्ये ब्रिटनमधील कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. अद्याप संपूर्ण अहवाल येणं बाकी आहे.
मुंबईत याआधीच आढळून आलेल्या या रुग्णांवर मुंबईत अंधेरीच्या सेवन हिल्स रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या स्ट्रेननं आतापर्यंत 50 देशांमध्ये कब्जा केला आहे. देशात 187 केसेस सापडल्या आहेत. तर त्यापैकी 13 रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत.
राज्यातील काय परिस्थिती?
अमरावती जिल्हा परिषेदेतल्या 15 जणांना कोरोना झाला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी ही माहिती दिलीय. जिल्ह्यात 24 तासात 671 रुग्ण आढळले. तर बुधवारी दिवसभरात सात रुग्णांचा मृत्यू झाला.
बुलढाणा जिल्ह्यात रुग्ण वाढतच आहेत. एका दिवसात जिल्ह्यात 446 रुग्ण वाढले आहेत. खामगाव आणि शेगांवमध्ये रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत. जिल्ह्यात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 3 हजारांवर गेली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 20 हजार रुग्ण आढळले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूरमध्ये ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षिकेला कोरोना झालाय. त्यामळे शाळेतल्या तब्बल 100 विद्यार्थी आणि 19 शिक्षकांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.
काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या मुलीचं अकाऊंट हॅक, पैशाची मागणी
वर्ध्यातल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातल्या 21 जणांना कोरोना झालाय. या काही विद्यार्थीसुद्धा आहेत.
धुळे शहर खान्देशातला कोरोनाचा नवा हॉटस्पॉट ठरत आहे. अवघ्या १२ दिवसात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या एक हजारांच्या पुढे गेली आहे.
नाशिकच्या मालेगावात कोरोनाचा पुन्हा कहर सुरू झाला आहे. एकाच दिवशी 60 रुग्ण सापडल्यानं प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.