मुंबई : राज्यासह देशात बऱ्याच प्रमाणात कोरोना नियंत्रणात आलेला आहे. मात्र तरीही दररोज कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. कोरोनाच्या दोन्ही लाटेत अनेकांनी आपले नातेवाईक गमावले. अनेकांना आपला रोजगार गमावा लागला. यामुळे आर्थिक समस्येचा सामना करावा लागला. आता कुठे सर्व काही सुरळीत झालं आहे. त्यात आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत म्हत्त्वाची बातमी आली आहे.  (corona virus third wave speculation to coming february march)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढच्या तीन महिन्यांमध्ये कोरोनाची लाट येणार असल्याचं म्हंटलं जातंय. तिसरी लाट येणार की नाही, कधी येणार, लसीकरण झालं तरीही लाट येणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा आणि काय काळजी घ्यायची, हे सांगणारा हा रिपोर्ट.



फेब्रुवारी, मार्चमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. मात्र तिसरी लाट फारशी तीव्र नसेल. विषाणूचा प्रभाव कमी झाला तरी वातावरणात त्याचे अंश असतात.


विषाणूविरोधात नागरिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार झालेली असते. त्यामुळे विषाणू स्वतःमध्ये बदल करुन आणखी शक्तीशाली होतो. जोपर्यंत विषाणू वातावरणात आहे, तोपर्यंत कोरोनाचा धोका कायम आहे. रशिया, जर्मनी, चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक होतोय. 


कोरोना संपला या भ्रमात राहून चालणार नाही. कोरोनाची तिसरी लाट रोखायची असेल तर पटापट लसीकरण करायलाच हवं आणि सर्व नियम पाळायला हवेत अन्यथा कोरोनाचं तिसरं संकट अटळ आहे.