मुंबई : राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.९९ टक्के एवढा झाला आहे. राज्यात काल  १८०२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ५७ हजार ८५१ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २७०१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५० हजार ४४ रुग्णांवर  उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४२ खासगी अशा एकूण ९७ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख ८४ हजार २६८  नमुन्यांपैकी  १ लाख १३ हजार  ४४५  नमुने पॉझिटिव्ह (१६.५७ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख  ८६ हजार  ८६८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५४३ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये  ८० हजार ५०२ खाटा उपलब्ध असून सध्या २७ हजार २४२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.



मंगळवारी राज्यात ८१ मृत्यू झाले आहेत. याशिवाय काल मुंबईतील ८६२ आणि उर्वरित राज्यातील ४६६ अशा एकूण १३२८ जुन्या मृत्यूंची नोंद घेण्यात येत आहे. त्यात जिल्हानिहाय आकडेवारी अशी: अहमदनगर १, अकोला १४, अमरावती ६, औरंगाबाद ३३, बुलढाणा २, धुळे १२, जळगाव ३४, जालना ४, लातूर ३, नांदेड २, नाशिक २८, उस्मानाबाद ३, पालघर ११, परभणी १, पुणे ८५, रायगड ११, रत्नागिरी १, सांगली ४, सातारा ६, सिंधुदूर्ग ३, सोलापूर ५१, ठाणे १४६, वाशिम १, यवतमाळ १ अशी एकूण ४६६. राज्याचा मृत्यूदर ४.८ झाला आहे.



काल नोंद झालेल्या ८१ मृत्यूंमध्ये मुंबई मनपा (५५), कल्याण-डोंबिवली मनपा (२), भिवंडी-निजामपूर मनपा (२), मीरा-भाईंदर मनपा (११), अहमदनगर (२), पुणे (१), पुणे मनपा (७), पिंपरी चिंचवड मनपा (१).