कोरोनाचा नवा स्ट्रेन : सरकारच्या नव्या गाईडलाईन्स
ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाचा ( New Strain of Coronavirus UK) स्ट्रेन सापडल्याने मोठी खबरदारी घेण्यात येत आहे.
मुंबई : ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाचा ( New Strain of Coronavirus UK) स्ट्रेन सापडल्याने मोठी खबरदारी घेण्यात येत आहे. सापडलेला कोरोनाचा नवा विषाणू अत्यंत घातक आहे. दरम्यान, भारतात महाराष्ट्र आणि दिल्लीत इंग्लंडवरुन आलेल्या दोघांना कोरोनाची लक्षण दिसून आली. मात्र, त्यांना नवा कोरोनाचा संसर्ग झाला आहे का, याची चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा कोरोनाने डोके वर काढू नये म्हणून राज्य सरकारने नव्या नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. प्रमुख महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. तसेच युरोप, दक्षिण आफ्रिका, सौदी देशातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी सरकारने नव्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. त्यानुसार हॉटेलमध्ये क्वारंटाईन होणाऱ्या असिम्टमॅटिक प्रवाशांना एअरपोर्टवर RTPCR टेस्टची गरज नाही, असे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात नागपूर येथे इंग्लंडमधून (Uk) आलेला तरुण कोरोना पॉझिटिव्ह आहे. तो नव्या कोरोना विषाणूचा बाधित आहे का, याची तपासणी करण्यात येत आहे. पुणे येथील प्रयोगशाळेत चाचणी करण्यात येत आहे. दिल्लीत नव्या कोरोनाच्या (coronavirus strain) संशयित रुग्णाला लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ब्रिटनहून (Britain) मंगळवारी आलेल्या प्रवाशाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, रुग्ण असिम्टमॅटिक ( लक्षणे नसलेले) असल्याची रुग्णालयाने माहिती दिली आहे.
... तर १४ दिवसांसाठी क्वारंटाईन
महाराष्ट्र सरकारने युरोप, दक्षिण आफ्रिका आणि मध्य पूर्व देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी नव्या गाईड लाईन्स जारी केल्या आहेत. हॉटेलमध्ये क्वारंटाईन होणाऱ्या असिम्प्टमॅटिक (लक्षणे नसलेले) प्रवाशांना विमानतळावर उतरल्या उतरल्या आरटीपीसीआर चाचणी करण्याची गरज नाही. मात्र पुढील पाच ते सात दिवसांमध्ये ही चाचणी करावी लागणार. ही चाचणी निगेटीव्ह आल्यास सात दिवसांसाठी होम क्वारंटाईन होणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र ही चाचणी पॉझिटीव्ह असल्यास आणि रूग्ण असिम्प्टमॅटिक असल्यास त्याच हॉटेलमध्ये पुढील १४ दिवसांसाठी क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.