मुंबई : राज्यात कोरोनाचा सहावा बळी गेला आहे. तर कोरोना बाधितांचा आकडा १८६ पोहोचला आहे. आज २८ नवे कोरोना पॉझिटिव्ह मुंबईच्या खासगी हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी मृत्यू झालेल्या ८५ वर्षांच्या रुग्णाला कोरोना झाल्याचं सिद्ध झाले आहे. मृत रुग्णाला मधुमेहाचा त्रास होता. शिवाय त्यांना पेसमेकरही बसवण्यात आला होता. त्यांचा मुलगा आणि नातवालाही कोरोनाची लागण झाली आहे. रुग्णाचे संबधित रुग्णालयात ऑपरेशनही करण्यात आले होते. त्यामुळे त्या रुग्णाच्या संपर्कात कोण कोण आले होते याचा आता शोध घेतला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता १८६ वर पोहोचली आहे. मुंबईत आज दिवसभरात नव्याने २८ रुग्ण आढळलेत. तर पुण्यात चार रुग्ण वाढलेत. मुंबईतल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७३ वर गेली आहे. तर नागपुरातल्या रुग्णांची संख्या ११ वर गेलीय. त्यामुळे आता राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या १८६ वर गेली आहे. 


पुण्यात ४ तर जळगावात १ रुग्ण वाढला


पुण्यात ४ रूग्ण वाढले तर जळगावमध्ये १ रुग्ण वाढला असून पुण्याच्या नायडू हॉस्पिटलमध्ये तीन आणि पुण्याच्याच केईएममध्ये १ रुग्ण असे चार रुग्ण झाले आहेत. तर सांगलीत आज पाठवले तीन ही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. दोन  इस्लामपूर येथील तर एक अन्य रुग्ण आहे. या तीन जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत. सांगली जिल्हा २३ आणि कोल्हापूर जिल्हा १ असे  २४ कोरोना बाधित आहेत. काल जी संख्या होती तेवढीच आहे. त्यात वाढ झालेली नाही, ही दिलासा देणारी बाब आहे.


अहमदनगरसाठी आनंदाची बातमी


अहमदनगरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. अहमदनगरला पहिल्या बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यांना १४ दिवस घरीच देखरेखीखाली ठेवणार  आहे. जिल्ह्यात आढळलेल्या पहिल्या बाधित रुग्णाचे १४ दिवसानंतरचे  दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यांना उद्या देणार डिस्चार्ज देण्यात येणार आहे. 


मुख्य सचिवपदी अजोय मेहता यांना मुदतवाढ



कोरोना व्हायरसच्या आणिबाणीच्या परिस्थिती राज्य प्रशासनातील प्रमुख पद असेलेल्या राज्याच्या मुख्य सचिवपदी अजोय मेहता यांना ३ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली असून ३० जूनपर्यंत ते आपल्या पदावर कायम असतील. यापूर्वी त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती ती ३१ मार्च पर्यंत होती. राज्यातल्या प्रशासनावर सध्याच्या परिस्थितीत मोठी जबाबादारी असून योग्य समन्वय राखून प्रशासनाला अशा परिस्थितीत काम करायचे आहे त्याकरता मुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.