मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरात आपलं जाळं पसरवलं आहे. भारतात ही आतापर्यंत ६९४ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारत १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन केला आहे. नागरिकांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. अनेक कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले आहे. या वर्क फ्रॉम होमचा नेमका काय फटका बसतोय हे एका व्हिडिओतून समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊनच्या काळात लोकं सोशल मीडियावर चांगलेच ऍक्टिव झाले आहेत. अशातच या महिलेचा टिकटॉक व्हिडिओ सोशल मी़डियावर व्हायरल झाला आहे. या महिलेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेच आपल्या नवऱ्याची तक्रार केली आहे. 


@komalashish01

jai hindhum ladies kisi waat lg jaye

 original sound - komalAshish422291

देशाला लॉकडाऊन केल्यामुळे आज प्रत्येकजण घरी आहे. असं असताना किचन मात्र लॉकडाऊन नाही. घरची सगळी मंडळी एकत्र असल्यावर खाण्याच्या अनेक फर्माईश पुढे येतात हे काही नवीन नाही. हीच तक्रार या महिलेने केली आहे. पती वर्क फ्रॉम होम असल्यामुळे त्याच्या खाण्याची मागणी वाढतच चालली आहे. दर अर्ध्या तासाने त्याला काही ना काही खाण्यास लागतं. यामुळे हैराण झालेल्या या पत्नीने थेट मोदींकडे याची तक्रार केली आहे. 


नवरा दर अर्ध्यातासाने खाण्याची मागणी करत आहे. कधी चिप्स, पकोडे, कधी भात... अनेक तऱ्हेरे पदार्थ त्याला बनवून देण्याची डिमांड वाढत असल्याचं या महिलेने सांगितलं. हा व्हिडिओ भरपूर व्हायरल झाला आहे.