मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या आणि कोरोना मृतांची संख्यादेखील वाढते आहे. धारावीत आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धारावीत एका ५५ वर्षीय व्यक्तीचा सायन रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दिल्ली निजामुद्दीन येथील मरकज कार्यक्रमाहून आल्यानंतर हा व्यक्ती कोरोना पॉजिटिव्ह आला होता. बुधवारी धारावीत आणखी ५ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता धारावीत कोरोनाग्रस्तांची संख्या ६०वर गेली आहे. तर धारावीत कोरोनामुळे एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धारावी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. अशा दाटीवाटीच्या ठिकाणी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव मोठी चिंतेची बाब ठरत आहे. धारावीत पालिकेकडून अनेक उपाय-योजना केल्या जात आहेत. प्रशासनाकडून सतत घरी राहण्याचं, अत्यावश्यक नसल्यास घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येतंय. मात्र नागरिक या सूचनांचं, नियमांचं पालन करताना दिसत नाहीत. मुंबईतील धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. पालिकेकडून हा परिसर सील करण्यात आला आहे. धारावीसारख्या भागात सोशल डिस्टंन्सिंग पाळलं न गेल्यास कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. 


कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ; राज्यात ११७ नवे कोरोना रुग्ण


मुंबईत आज नव्या 66 कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 1822वर पोहचला असून 112 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.