दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: कोरोनामुळे संपूर्ण जग हादरले असतानाच मुंबईतील स्थिती काहीशी नियंत्रणात राखण्यात महापालिका आणि राज्य सरकारला यश आल्याचे सध्यातरी दिसत आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे २०३ रुग्ण आढळून आले आहे. तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मुंबईच्या ८५ रुग्णांचा आणि सहा मृतांचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

७ एप्रिलपर्यंत आमचे राज्य कोरोनामुक्त असेल; मुख्यमंत्र्यांचा दावा

मुंबईची एकूण लोकसंख्या आणि  परदेशातून आलेल्या लोकांची संख्या पाहता मुंबईतील स्थिती सध्या तरी नियंत्रणाखाली असल्याचे म्हटले जातेय.  १ मार्चपासून परदेशातून लाखो प्रवासी मुंबईत दाखल झाले. त्यापैकी सुमारे पावणेतीन लाख जणांची विमानतळावर तपासणी करण्यात आली. तर तीन हजार जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. जे पॉझिटिव्ह आढळले त्यांना समाजात फिरण्याआधीच विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. याशिवाय घरोघरी जाऊनही काही ठिकाणी तपासणी करण्यात आली. 


राज्यात कोरोनाचे एकूण २०७ रुग्ण, ८ जणांचा मृत्यू

त्यामुळे मुंबईसारख्या दाटीवाटीच्या शहरात कोरोना काही प्रमाणात नियंत्रणात ठेवण्यात यंत्रणांना यश आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.  तरीही पुढील १० ते १२ दिवस परीक्षेचे आहेत. कारण घरी विलगीकरणात असलेल्यांमध्ये कोरोनाची लक्षणे असतील आणि ते कोणाच्या संपर्कात आले असतील तर त्यांना बाधा होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सरकारकडून नागरिकांना वारंवार घराबाहेर न पडण्याची विनंती केली जात आहे.
दरम्यान, भारतात कालपर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या ११०० वर पोहोचली आहे. आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ९५ जण कोरोनाच्या संसर्गातून बरेही झाले आहेत.