मुंबई : राज्यासह देशात कोरोना व्हायरसच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. गर्दीच्या ठिकाणी कोरोना पसरण्याचा अधिक धोका असतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी खबरदारी घेण्याची सूचना आरोग्य विभागाकडून आणि सरकारकडून करण्यात येत आहे. सॅनिटायझरचा वापर करा, हात साबणाने किमान २० सेकंद धुतले पाहिजे. नाकाला, तोंड, कान, डोळे यांना सारखा हात लावू नका. शिंकताना किंवा खोकताना रुमाल अथवा टीश्यू पेपर घ्यावा,  असे आवाहन करण्यात येत आहे. मुंबईत जास्त करुन रेल्वेला गर्दी दिसून येत आहे. लोकलमध्ये दररोज लाखो प्रवासी प्रवास करत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका लक्षात घेता लोकल आता फिनाईलने स्वच्छ करण्यात येणार आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाची जगात दहशत दिसून येत आहे. जगात लाखो लोक या साथीच्या आजाराने त्रस्त आहेत. तर ४००० पेक्षा जास्त लोकांचा आतार्पंयत मृत्यू झाला आहे. देशातही ८०च्या घरात बाधा झालेल्यांची संख्या गेली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रातही १९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय घेण्याचे आवाहन आरोग्या विभाग आणि राज्य सरकारने केले आहे. मुंबई रेल्वे आणि उपनगरीय  लोकलने दररोज ७५ लाखांहून अधिक लोक रेल्वेने प्रवास करत आहेत. कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने रेल्वे फिनाईलने साफ करण्याचा निर्णय घेतला आहे.



रेल्वे लोकलचे डबे रात्री साफ करण्यात येणार आहेत. याआधी लोकल केवळ साफ केल्या जायच्या. तरे १५ दिवसांनी पाण्याने धुतल्या जायच्या. आता दररोज रात्री लोकल गाड्या फिनाईल पाण्याने फुसून साफ करण्यात येणार आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज येथील म्युझियम आणि हेरीटेज वॉक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मेट्रोमध्येही रेल्वे डब्यांचे सॅनिटायझेन केले जाणार आहे.