मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊनमध्ये सगळेच जण घरी आहेत. अशावेळी अनेक नेते मंडळी देखील त्यांच्या घरी आहेत. नागरिकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. असं असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी देखील फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एवढ्या वर्षाच्या राजकीय काळात पहिल्यांदाच सुप्रिया सुळे इतके दिवस घरी आहेत. जेव्हा त्यांची कार्यकर्त्यांशी भेट नाही. बोलणं होतं पण भेट होत नाही. माझा मतदार संघ म्हणजे माझं कुटूंब आहे. नियम कायदा हा सगळ्यांसाठी सारखाच आहे.त्यामुळे सरकारने घरी राहण्यास सांगितलं आहे. त्यामुळे मी देखील घरी आहे. आणि शरद पवारांनी देखील नियम पाळण्याचे आदेश दिले आहेत. आज ३० दिवस पूर्ण झालेत जेव्हा मी पूर्ण वेळ घरी आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 



सुप्रिया सुळे यांनी सगळ्यांना विनंती केली आहे की, कुणीही आजार लपवू नका. घरी राहा पण काहीही त्रास झाला तर उपचार घ्या. तसेच कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी मी राज्यमंत्री यशोमती ठाकूर यांच्याशी संपर्क साधला. पुण्यात असा उपक्रम राबविण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या परिक्षेबाबतही सुप्रिया सुळे या फेसबुक लाईव्हमध्ये बोलल्या. विद्यार्थ्यांना अभ्यास सतत करण्याचा यावेळी त्यांनी सल्ला दिला. 


या लॉकडाऊनमध्ये आपण ऐकटे नाहीत संपूर्ण जग आपल्यासोबत आहे. कंटाळा येणार नाही याची काळजी घ्या. लॉकडाऊननंतर अनेक बदल करावे लागणार आहे. बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.