मुंबई : Coronavirus in Mumbai : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने हळूहळू निर्बंधात शिथिलता आणली जात आहे. मात्र, मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी आहे. कोविडचे निर्बंध कमी करण्यात येत असताना आता मुंबई पूर्णपणे निर्बंधमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. तसे संकेत देण्यात आले आहेत. फेब्रुवारीनंतर मुंबई पुन्हा एकदा पूर्वपदावर येणार आहे. (Mumbai Corona Restrictions Will Be Free?)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महापालिका अनलॉकची शिफारस टास्क फोर्सला करणार आहेत. याबाबतचे संकेत अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यानी दिले आहेत. त्यामुळे मुंबई निर्बंधमुक्त होणार आहे. रुग्णसंख्येचा आकडा झपाट्याने घसरत आहे. पुढील दोन आठवडे रुग्ण संख्या अशीच घसरत राहिली तर फेब्रुवारीनंतर मुंबई 100 टक्के निर्बंधमुक्त करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.



दोन आठवडे रुग्णसंख्येचा आढावा घेत मुंबई अनलॉक करण्याची शिफारस पालिका टास्क फोर्सला करणार आहे. डिसेंबरच्या शेवटी 21 हजारांवर आढळणारी रुग्ण संख्या सध्या 600 वर आली आहे.


दरम्यान, राज्यात कोरोना रूग्ण कमी झाल्याने नाट्यगृह, चित्रपटगृह १०० टक्के क्षमतेने सुरू करा अशी मागणी मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी केली आहे.