मुंबई : बहुचर्चित मुंबई कोस्टल रोडचे एक्स्टेंशन होत कोस्टल रोड हा थेट घोडबंदर मार्गापर्यंत पोहचणार आहे. MMRDA कडून या प्रकल्पाची आर्थिक आणि व्यावहारिक उपयुक्तता याचा अभ्यास करण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 या अभ्यास अनुकूल ठरल्याने MMRDAच्या कार्यकारी समिती बैठकीत मार्वे - भाईंदर - घोडबंदर रोड या कोस्टल रोड म्हणजेच किनारी मार्गाचा विस्तृत प्रकल्प आराखडा बनवायला परवानगी दिली आहे. 


यामुळे भविष्यात ठाणे - घोडबंदर - मुंबई पश्चिम उपनगर - नरिमन पॉईंट असा सागरी मार्गाद्वारे वेगवान प्रवास करणे शक्य होणार आहे. तसंच दहिसर-भाईंदर-घोडबंदर रस्त्यांवरील वाहनांचा भार हलका होणार आहे.