Couple Kissing Video :  मध्य रेल्वे मार्गावरील  (Central Railway) 154 वर्षे जुना ब्रिटिशकालीन कर्नाक उड्डाणपूल (Carnac Bridge) पाडण्याचं काम सुरू झालंय. त्यामुळे कामानिमित्ताने बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचे हाल होतं आहेत. अशातच तरुण-तरुणीचा रोमान्सचा एक व्हिडीओ (couple romance) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.खुल्लम खुल्ला लोकांच्या नजरेला न जुमानता हे कपल एकमेकांमध्ये मग्न आहेत. 


नॉनस्टॉप Kissing चा सपाटा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईमध्ये अनेक ठिकाणी प्रेमी युगुल (lover) खुलेआम रोमान्स करताना दिसतात. मुंबईतील नरिमन पॉइंट (Nariman Point) असो किंवा वांद्रे बॅंडस्टँड (Bandra Bandstand) यासारख्या अनेक ठिकाणी लहान मुलांना घेऊन फिरणं कठीण झाले आहेत. अशातच या व्हिडीओमधील प्रेमी युगुलाने हद्द पार केली आहे. रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉवर एक कपल नॉनस्टॉप Kissing करत आहेत. हा व्हिडिओ डोंबिवली रेल्वे स्थानकावरचा (dombivali railway station) आहे. डोंबिवली रेल्वे स्थानक हे प्रवाशांनी नेहमीच गजबजलेलं असतं. अशा गजबजलेल्या भर गर्दीतच या तरुण-तरुणीचे अश्लिल चाळे सुरु होते. स्टेशनवरच्या एका प्रवाशाने त्यांचे हे अश्लील चाळे मोबाईल (Mobile) कॅमेरात कैद केले. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (couple kissing dombivali railway station Video Viral on social media nmp)


धक्कादायक व्हिडीओ - 



 


हेही वाचा - Kissing Video : सगळ्यांसमोर कॉलेजमध्ये मुलीला जबरदस्ती Kiss आणि मग...


 


लोकांमध्ये नाराजी


लोकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. काही प्रवाशांनी त्या दोघांना विरोध केल्यानंतर ते तिथून निघून गेले. पण यानंतर तसाच प्रकार त्यांनी सीएसएमटी (CSMT) प्लॅटफॉर्मवर सुरु केला. त्या कृत्याचाही व्हिडीओ एका प्रवाशाने काढला. लोकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर डोंबिवली (Dombivli) रेल्वे पोलिसांनी याची दखल घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा गोष्टी करणं चुकीचं असून त्या दोघांविरोधात एनसी नोंदवली असल्याचं रेल्वे पोलिसांनी सांगितलं.