मेघा कुचीक, झी मीडिया, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक ( NCP Minister Nawab Malik ) यांची जेलमधून बाहेर पडण्यासाठी धडपड सुरु आहे.  मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Session Court) विशेष पीएमएलए (PMLA) कोर्टात सुनावणी झाली. नवाब मलिक यांना कोर्टाने पुन्हा एकदा धक्का दिला आहे. नवाब मलिक यांचा जामीन अर्ज पीएमएलए कोर्टाने फेटाळून लावला आहे. नवाब मलिक यांना जामीन का मिळत नाही या संदर्भातील  43 पानांचा आदेशच कोर्टाने सार्वजनिक केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई विशेष पीएमएलए कोर्टाने नवाब मलिकचा जामीन अर्ज नुकताच फेटाळला, याबाबतचा सविस्तर 43 पानांचा आदेश सार्वजनिक करण्यात असून नक्की जामीन का फेटाळण्यात आला त्याची ही कारणे...


  • प्रथम दर्शनी मृत हसिना पारकर, सलीम पटेल आणि नवाब मलिक यांच्यात मुनिरा प्लंबर आणि तिची आई मरियम गोवाला यांच्या मालकीची जमीन बळकावण्याचा कट रचला होता, असे पुरावे आहेत. दाऊदच्या निकटवर्तीयाशी व्यवहार जरत असल्याची जाणीव मलिक याांना आधीपासूनच होती.

  • नवाब मलिक यांचे नाव गुन्ह्यात नाही. मात्र मालमत्ता ताब्यात घेणे आणि त्यावर दावा करणे यासह प्रत्येक प्रक्रिया ही मनी-लाँडरिंगच्या कक्षेत येते.  मलिक यांच्या सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रा.  लि.ने सहआरोपी सरदार खान याला 2005 साली दिलेले कव्हर क्षेत्रही खरेदी केले.

  • मृत हसिना पारकर आणि सलीम पटेल यांचा गोवाला कंपाऊंडमध्ये सहभाग असल्याचे नवाब मलिक यांना माहीत होते.  मालकीची माहिती असूनही, नवाब मलिक यांनी मूळ मालकांच्या नोटरीकृत पॉवर ऑफ अॅटर्नीमध्ये नमूद केलेल्या तथ्यांची पडताळणी केली नाही.

  • नवाब मलिक यांना माहिती होती की गोवाला कंपाऊंड ही मुनिरा प्लंबर आणि तिची आई मरियम गोवाला यांच्या मालकीची होती.  साक्षीदारांच्या जबाबावरून हे रेकॉर्डवर आले आहे की, नवाब मलिक यांनी मुनिरा प्लंबरकडे कोणतीही चौकशी केली नाही आणि सलीम पटेल यांनी सांगितलेल्या तथ्यांची पडताळणी केली नाही.

  • ईडीने नवाब मलिक यांच्या आरोग्याच्या स्थितीची पडताळणी करण्यासाठी वैद्यकीय समिती स्थापनेसाठी अर्ज दाखल केला होता.  याला नवाब मलिक यांच्या वतीने कडाडून विरोध करण्यात आला.  जर ते गंभीर आजाराने त्रस्त असेल तर वैद्यकीय समिती स्थापन करण्यास त्यांनी स्वत: संमती द्यायला हवी होती. वैद्यकीय अहवाल नाही  आणि वैद्यकीय समितीने नवाब मलिक यांची तपासणी न केल्यामुळे मलिकची विनंती स्वीकारण्यास न्यायालय इच्छुक नाही.


नवाब मलिकांना अटक का झाली?


नवाब मलिक यांना मनी लॉण्ड्रींग प्रकरणी (Money Laundering Case) अटक करण्यात आली आहे. मुंबईती कुर्ला येथील जमीन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर आरोप आहेत. मनी लॉण्ड्रींग प्रकरणी अटक करण्यात आलेल्या इक्बाल कासकर (Iqbal Kaskar) यांच्या चौकशीदरम्यान मलिक यांचं नाव समोर आलं होतं. 23 फेब्रुवारी 2022 रोजी नवाब मलिकांना ताब्यात घेण्यात आले. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) रिअल इस्टेटच्या माध्यमातून टेरर फंडिंग करतो आणि रिअल इस्टेटचे व्यवहार हे मनी लॉन्ड्रींगच्या माध्यमातून केले जातात. यासंदर्भात जवळपास नऊ ठिकाणी ईडीने  (ED) धाडसत्र राबवले होते.