मुंबई :  शहरामधील हाफकिन बायोफार्माला ( Haffkine Biopharma) कोव्हॅक्सिन लस उत्पादनासाठी (Covaxine Vaccine Production )159 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. देशांतर्गत लस उत्पादनाचा वेग वाढणार आहे. हाफकिन बायोफार्मा पुढील आठ महिन्यात उत्पादन करणार आहे. केंद्र सरकारकडून 65 कोटी तर राज्य सरकारकडून 94 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. आता हाफकिन 22.8 कोटी कोव्हॅक्सिनचे उत्पादन करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाउनच्या नियमात शिथिलता आणली आहे. मात्र अजूनही संपूर्ण अनलॉक करण्याची स्थिती नाही. त्यामुळे अनेक राज्यांनी लसीकरण मोहीम आणखी गतीने वाढवण्याची मागणी केली आहे. असे असले तरी कोरोना लशींचा तुटवडा असल्याने अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद आहेत. त्यासाठी लस उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 


आता महाराष्ट्र राज्यातील हाफकिन बायो फार्मास्युटीकल कॉर्पोरेशन लिमिटेडला कोरोनावरील कोव्हॅक्सिन लसीचे एका वर्षात  22.8  कोटी डोस तयार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे उत्पादन मुंबईतील परेल कॉम्प्लेक्समधील कंपनीत करण्यात येणार आहे.  



 हाफकिन बायोफार्माला भारत बायोटेक लिमिटेडने हस्तांतरण व्यवस्थेनुसार कोव्हॅक्सिन लस उत्पादनाचं तंत्रज्ञान उपलब्ध करुन दिले आहे. कोव्हॅक्सिन लस उत्पादनासाठी हाफकिन बायोफार्माला देण्यात येणाऱ्या एकूण अनुदानात केंद्र सरकारकडून 65 कोटी तर राज्य सरकारकडून 94 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.