मुंबई : कोरोनाच्या ( coronavirus) संकटामुळे थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी (Thirty First Celebration) मुंबईत (Mumbai) यंदा नवे नियम असणार आहेत. थर्टीफर्स्ट (Thirty First) कसा साजरा करायचा याचे नियम मुंबई महापालिका २० डिसेंबरला जाहीर करणार आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवाळीत फटाके फोडण्यावर जसे निर्बंध होते, तशा प्रकारचे निर्बंध महापालिका थर्टी फर्स्टसाठी घालण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या काळात अलिकडेच गर्दी केल्याने आणि कोरोनाचे नियम न पाळल्याने मुंबई महापालिकेने काही पब्ज आणि नाईट क्लबवर कारवाई केली होती. इतकेच नाही तर महापालिका आयुक्तांनी राज्य सरकारला पत्र लिहिले आहे आणि मुंबईत नाईट कर्फ्यू लावायची मागणी केली आहे. 


महाराष्ट्रात कोरोनाचे ४ हजार २६८ नवे रुग्ण


दरम्यान, महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) काल दिवसभरात कोरोनाचे (Covid-19) ४ हजार २६८ नवे रुग्ण आढळून आलेत. तर काल दिवसभरात ८७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालाय. काल दिवसभरात २ हजार ७७४ करोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत राज्यातील एकूण १७ लाख ४९ हजार ९७३ रुग्णांनी  करोनावर मात केली आहे. यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९३.४६ टक्के झाला आहे.