मुंबई: कोरोनामुळे लोकल सेवा बंद ठेवण्यात आली होती. 15 ऑगस्टपासून पुन्हा एकदा लोकलला मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली आहे. राज्यात सरकारी कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही प्रवास करण्याची परवानगी नव्हती. मात्र 15 ऑगस्टपासून लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना लोकलनं प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याआधी अनेक जण लोकलनं प्रवास करता यावा म्हणून वेगवेगळे जुगाड करायचे. मात्र आता लसीचं प्रमाणपत्र बंधनकारक असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकल प्रवासासाठी दोन्ही डोस घेऊन पूर्ण झाल्यानंतर 14 दिवसांनी लोकल प्रवास करता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला प्रमाणपत्र दाखवणं बंधनकारक आहे. मात्र त्यावरही एक भन्नाट जुगाड शोधून काढला आहे. लोकलनं प्रवास करायचा असेल तर लसीचं प्रमाणपत्र प्रिंट करण्यात आलेला टी शर्ट तुम्ही घालू शकता. या टी शर्टवर लसीचं प्रमाणपत्र छापून मिळत आहे. असा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


स्टॅंडअप कॉमेडीयन असलेल्या अतुल खत्रींनी त्यांचा असा टीशर्ट घातलेला फोटो ट्वीट केला आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. हा जुगाड खरंच खूप भन्नाट आहे. सोशल मीडियावर युझर्सनी त्याला चांगला प्रतिसादही दिला आहे.



पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टमधील खत्रींचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. ही आयडिया लसीचे दोन डोस घेतलेले लोक वापरू शकतात. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना प्रत्येकवेळी प्रमाणपत्र दाखवण्यापेक्षा हा टी शर्ट घालून जाणं चांगला पर्याय आहे. असंही अनेक युझर्सनी म्हटलं आहे. अतुल खत्रींनी घातलेल्या टी-शर्टवर कोरोना प्रमाणपत्र प्रिंट करण्यात आलं आहे. हा फोटो सोशल मीडियावर खूपच हिट ठरत आहे.