मुंबई : आता लहान मुलांनाही मिळणार कोरोनाची लस. आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी. कोरोनावर मात करण्याचासाठी प्रतिबंधात्मक लस नागरीकांना देण्यात आली. सुरूवातीला ही लस 60 वर्षांवरील व्यक्तींना देण्यात आली. त्यानंतर 45 वय वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सरकारने परवानगी दिली. यानंतर 18 वर्षांवरील तरूणांना लस देण्यास मंजूरी दिली. आता 2 ते 18 वय वर्ष गटातील मुलांना लस देण्यास परवानगी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2 ते 18 वर्षांच्या मुलांवर कोरोना लशीची चाचणी करण्याची परवानगी भारत बायोटेकला देण्यात आली आहे असं वृत्त पीटीआयने दिले होते. लहान मुलांवर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी करण्याची परवानगी भारत बायोटेकला देण्यात आल्याचं पीटीआयने सांगितले होते. देशातील विविध ठिकाणी एकूण 525 लहान मुलांवर ही चाचणी करण्यात आली. 


 लहान मुलांच्या लसीकरणाबाबत अत्यंत महत्त्वाचे मुद्दे 


- आता लहान मुलांनाही मिळणार कोरोनाची लस
- 2 ते 18 वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लसीला मंजुरी
- मुलांच्या लसीकरणाला DCGIची परवानगी
- मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा


Covaxin कोरोना लसीवर मोठी बातमी आली आहे. आता 2 वर्ष ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोवासीन विरुद्ध लसीकरण करता येते. त्यास मान्यता देण्यात आली आहे. भारत बायोटेक आणि आयसीएमआरने मिळून कोव्हॅक्सीन बनवले आहे. ती आहे भारतीय कोरोना लस. कोरोना विषाणूविरूद्ध क्लिनिकल चाचण्यांमध्ये कोव्हॅक्सीन सुमारे 78 टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले.


यासंदर्भात केंद्र सरकारकडून लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील असे कळले आहे. असे सांगितले गेले आहे की, मुलांना प्रौढांप्रमाणे कोव्हॅक्सीनच्या दोन लसही मिळतील. आतापर्यंत घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये, लसीच्या मुलांना कोणतेही नुकसान झाल्याची चर्चा झालेली नाही.