मुंबई : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने कठोर निर्बंध जाहीर लागू केले आहेत. दरम्यान यानंतर व्यापारी संघटनांची नाराजी पाहायला मिळत आहे. आम्हाला नुकसानभरपाई देणार का ? असा प्रश्न व्यापारी संघटनांनी राज्य सरकारला विचारलाय. हा मिनी लॉकडाऊन आहे असं सरकार म्हणत आहे मात्र व्यापाऱ्यांसाठी हा पूर्णपणे लॉकडाऊन आहे. मॉल, रेस्टॉरंट बंद असणार आहेत. 13 लाख दुकानांपैकी 10% दुकानं अत्यावश्यक असतील. बाकी सर्व दुकानं बंद राहणार आहेत. या निर्णयामुळे व्यापारी नाराज आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


वाढत्या कोरोनामुळे सरकारने हा निर्णय घेतला. पण  आमच्या कर्मचाऱ्यांचा पगार कोण देणार, टॅक्स, भाडं कसं भरणार ? असा प्रश्न व्यापारी संघाचे अध्यक्ष विरेन शाह यांनी उपस्थित केलाय. आम्ही सरकारबरोबर आहोत, पण जर लोक घरी बसले तर खाणार काय ? त्यांना पगार कोण देणार ? त्यांच्या मुलांना कुटुंबाना पैसे कोण देणार ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. 


अनेक दुकानं, मॉल भाड्यावर असतात, भाडं कसं भरायचं ? याचे उत्तर महाविकास आघाडी सरकारने द्यावे अशी मागणी व्यापारी संघटनेनं केलीय.