मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे, उद्या किंवा परवा त्यांची जेलमधून सुटका होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्यन खानला अखेर 25 दिवसांनंतर न्यायालयानं जामीन मंजूर केला आणि शाहरुखसह अनेकांनाच मोठा दिलासा मिळाला. सलग तीन दिवसांपासून या प्रकरणावर सुनावणी सुरु होती. यादरम्यान विविध मुद्द्यांना अनुसरून युक्तिवाद मांडण्यात आला. ज्यानंतर गुरुवारी उच्च न्यायालयानं दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकल्यानंतर जामीन मंजूर केला. 


एनसीबीनं, सदर प्रकरण हा अजामीनपात्र गुन्हा असल्याचा युक्तिवाद केला होता. पण, अखेर आर्यन खानसह इतर दोघांचाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.



आर्यनला अखेर जामीन मिळाल्याने शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर खास सेलिब्रेशन करण्यात आलं. जामीन मंजूर होताच फटाकेबाजी करण्यात आली. त्याची दृश्य झी 24 तासच्या कॅमेरात ही कैद झाली आहेत. मुलाची सुटका झाल्याने शाहरुख आणि त्याच्या परिवाराने सुटकेचा श्वास सोडल्याचं बोललं जात आहे.



वकीलांनी NCB ची कमकुवत पुढे करत आपला युक्तीवाद मांडत आर्यनला जामीन मिळवून दिला. NCB कडून अतिरिक्त महाधिवक्ता अनिल सिंग या प्रकरणी युक्तिवाद मांडत होते. तर, बचावपक्षाच्या वतीनं सतीश मानेशिंदे, माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी न्यायालयात काही मुद्दे मांडले आणि प्रकर्षाने उचलून धरले.