मुंबई : क्रिकेट विश्वचषकातील सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या बुकींना माटुंगा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लोटसबुक २४७ डॉट कॉम या संकेतस्थळावरून ऑनलाईन सट्टा सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी दादरच्या एका हॉटेलमध्ये छापा टाकला. याछाप्यात तीन जणांना अटक करण्यात आली आहे.


तसेच त्याचसोबत मुंबई पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेला ज्ञानेश्वर खरमाटे यालाही अटक करण्यात आली. तर मुलुंडमध्ये देखील डायमंडएक्स नाईन डॉटकॉम या संकेतस्थळावरून सट्टा लावणाऱ्या दोघांना अटक कऱण्यात आली आहे. या संकेतस्थळाच्या माध्यामातून देशभरातून ऑनलाईन सट्टा सुरू होता. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे.