मुंबई : मुंबईहून रांचीला (Mumbai to Ranchi) जाणाऱ्या विमानात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विमानाच्या कर्मचाऱ्यांना टॉयलेटमधून धूर येताना दिसला. यावेळी त्यांनी तपासणी केली असता एक तरुणी टॉयलेटमध्ये चक्क सिगरेट (Cigarette) पीत असल्याचं आढळलं. ही तरुणी मुंबईहून रांचीला जात होती. विमानात नियम तोडून सिगरेट पित असल्याप्रकरणी या तरुणीला अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर त्या तरुणीने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) नावाच हवाला दिला. या तरुणीवर एव्हिऐशन सिक्युरिटी कायद्यातंर्गत (Aviation Security Act) तक्रार दाखल करण्यात आली असून प्रकरणाचा तपास सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विमानात सिगरेट पिताना जी तरुणी आढळली तिचं नाव ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) असं आहे. ती रांचीत राहणारी आहे. मुंबईत अभिनेता शाहरुख खानला भेटायला आली होती, असा दावा या तरुणीने केला आहे, मुंबईहून विमानाने ती पून्हा रांचीला जात होती. तिने केल्या दाव्यानुसार शाहरुख खानच्या पठाण चित्रपटावर त्या तरुणीने एक ब्लॉग (Blog) लिहिला होता. हा ब्लॉग शाहरुख खानने वाचावा अशी तिची इच्छा होती, त्यासाठी ती मुंबईत आली होती. शाहरुख खानबरोबर तिची भेट झाली की नाही याबाबत पोलिसांनी काहीही माहिती दिलेली नाही.


एअरपोर्ट सिक्युरिटीला दिला चकवा
रांचीत राहणाऱ्या या मुलीने मुंबई एअरपोर्ट सुरक्षाव्यवस्थेला (Airport Security) चकमा देत माचिस आणि सिगरेट विमानात नेली. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळाने ही तरुणीने विमानाच्या टॉयलेटमध्ये गेली आणि तिथे ती सिगरेट पीत होती. सिगरेटचा धूर आणि वास आल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी त्या तरुणीची तपासणी केली असता तिच्याजवळ सिगरेट आणि माचिसचं पाकिट आढळून आलं.


सुरक्षा व्यवस्थेला दिला माहिती
विमान रांची विमानतळावर उतरल्यावर विमानातील क्रु मेंबर्सने CISF ला प्रकरणाची पूर्ण माहिती दिली. सीआईएसएफने त्या तरुणीला अटक करुन एअरपोर्ट पोलिसांच्या स्वाधीन केलं. ऐश्वर्या राय ही एक ब्लॉगर आहे. मनोरंजनासह अनेक विषयांवर ती सोशल मीडियावर ब्लॉग लिहित असते.