सावधान इंडियात काम करता करता 2 अभिनेत्रींकडून प्रत्यक्षात धक्कादायक गुन्हा
क्राईम पेट्रोल आणि सावधान इंडिया या भारतातील घराघरात चालणाऱ्या मालिकेमधील दोन अभिनेत्रींना पोलिसांकडून अटक करण्यात आले आहे.
मुंबई : क्राईम पेट्रोल आणि सावधान इंडिया या भारतातील घराघरात चालणाऱ्या मालिकेमधील दोन अभिनेत्रींना पोलिसांकडून अटक करण्यात आले आहे. या दोन्ही अभिनेत्रींना लॉकडाऊन काळात काम नसल्याने आणि त्यांचे खाण्याचे हाल झाले. यामुळे त्यांनी त्यांच्या मालिकेतील आरोपींप्रमाणे हूशारीने चोरी करायची ठरवले. परंतु अखेर पोलिसांसमोर खऱ्या आयुष्यात देखील त्यांची युक्ती फसली आणि पोलिसांनी त्यांना पकडले.
18 मे ला त्यांनी गोरेगावमधील त्यांच्या एका मैत्रिणीचे 3 लाख 28 हजार रुपये चोरले. खरेतर 18 मेला या दोघीही गोरेगाव येथील आरे कॉलनीमधील रॉयल पाम नावाच्या पॉश सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहायला गेल्या होत्या. तेथे आधीपासूनच एक पेईंग गेस्ट रहात होती. तिचे लॉकरमधील पैसे चोरुन या दोघी पळाल्या.
त्या दोघींवर आधीपासूनच संशय असल्याने दुसऱ्या पेईंग गेस्ट ने पोलिसांत या दोघीं विरुद्धा तक्रार दाखल केली. पोलिसांनी या दोघांची विचारपूस केली असता, त्या दोघीं आपला गुन्हा मानायला तयार नव्हत्या. परंतु पोलिसांनी त्यांना सीसीटीव्ही फूटेज दाखवल्यानंतर त्यांनी त्यांचा गुन्हा मान्य केला आहे.
त्यांनी चोरी करण्यामागचे कारण स्पष्ट करत पोलिसांना सांगितलं की, लॉकडाऊनमुळे त्यांचे हाल झाल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले. या अभिनेत्रींचे नाव सुरभि श्रीवास्तव आणि मोहसिन शेख असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिनुसार, या दोघींनी अनेक वेब सीरिजसह क्राईम पेट्रोल आणि सावधान इंडियामध्ये काम केले आहे.
त्यांच्याकडून सध्या 50 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत आणि त्यांना 23 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार आहे.