Mumbai Crime News : संताप आणि चीड आणणारी घटना. मुंबईतील मालाड (Malad) येथे एक धक्कादायक घटना समोर आली. पत्नी घटस्फोट (Divorce) देत नाही म्हणून माथेफिरु नवऱ्याने तिला फिनेल पाजण्याचा प्रयत्न केला तसेच तिच्या अंगावर ॲसिड फेकले. (Husband Threw Acid On His Wife) यामध्ये पत्नी जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. (Maharashtra Latest News) दरम्यान, पत्नीच्या तक्रारीनंतर पतीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (husband and wife argue)


पत्नीशी पटत नसल्याने दुसऱ्या एका महिलेला आणले घरी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पतीने पत्नीला जबरदस्तीने फिनेल पाजले. तिने उलट्या करुन हे सर्व फिनेल बाहेर काढले. यावेळी बाथरुममधील ॲसिड पतीने आणून तिच्या अंगावर ओतले. यावेळी तिने चेहरा मागे केला असताना तिच्या छातीवर ॲसिड पडले. यात ती जखमी झाली. घटस्फोटासाठी हे अमानुष कृत्य केल्याचे पुढे आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पहिल्या पत्नीशी पटत नसल्याने पतीने दुसऱ्या एका महिलेला घरी आणले. मात्र, पहिली पत्नी घटस्फोट देत नसल्याने तिला फिनेल पाजले. तरीही ती ऐकत नसल्याने तिच्या अंगावर अॅसिड फेकले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले. महिलेच्या तक्रारीवरून कुरार पोलिसांनी तिचा पती आणि त्याची दुसरी पत्नी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


घटस्फोटासाठी दबाव, समोर ठेवली कागदपत्रे 


पती पत्नीला मारहाण करीत असल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून ती माहेरी जाऊन राहू लागली. हीच संधी साधत पतीने दुसऱ्या एका महिलेला घरी आणले. तिच्याशी लग्न करण्यासाठी पहिल्या पत्नीवर घटस्फोटासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तीन सासरी गेली होती. यावेळी पती आणि घरात पतीसोबत राहणाऱ्या महिलेने घटस्फोटासाठी तयार करण्यात आलेली कागदपत्रे तिच्यासमोर सहीसाठी ठेवली. यावेळी तिने नकार दिला. त्यानंतर पत्नीने तिला धमकावले. तिला फिनेल पाजले. त्यानंतर त्यांनी तिच्या अंगावर फेकले ॲसिड फेकले.  यावेळी तिने आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यांनी याबाबतची माहिती कुरार पोलिसांना दिली. त्यावेळी हा प्रकार उघड झाला.