Mumbai Dancer Hostage in Dubai: दुबईत डान्स शो करण्याच्या नावाखाली महिला डान्सरसोबत फसवणूक केल्याची घटना महाराष्ट्रातील ठाण्यातील मुंब्रा परिसरातून समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की, "पीडित महिला सोना ही व्यवसायाने लावणी नृत्यांगना असून, ती स्टेज शो करून आपला उदरनिर्वाह करते. लावणी नर्तकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपशी ती जोडलेली आहे. याच ग्रुपमध्ये एका डान्सर आणि एजंटने दुबईला स्टेज शो ऑफर केला होता, ज्यामध्ये चांगल्या पैसे देण्याची चर्चाही झाली होती." याच कारणामुळे सोनी दुबईला जायला तयार झाली आहे. 



स्टेज शोच्या नावाखाली करावा लागला क्लबमध्ये डान्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टेज शोची ऑफर आल्यानंतर सोनी १५ नोव्हेंबरला दुबईला गेली. पण तिकडे गेल्यावर तिला धक्का बसला. तिथे गेल्यावर तिला कळले की स्टेज शो करण्याऐवजी तिला तिथल्या एका क्लबमध्ये डान्स करायाचा आहे हे सांगण्यात आले. पण सोनाने क्लबमध्ये डान्स करण्यास नकार दिला. नकार दिल्यामुळे तिला डांबून ठेवण्यात आले. जेवणही दिवसातून एकदाच दिले जायचे आणि तिला सोडण्यासाठी सहा लाख रुपयांची मागणी केली.


 हे ही वाचा: सर्वात उंच हॉटेल...105 रूम्स, पण 55 अब्ज रुपये खर्चून बांधलेल्या 'या' वास्तूमध्ये कोणीच येत नाही, कारण...


पोलिसांनी केली सुटका 


वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सांगितले की, "डान्सरच्या पतीने मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यानंतर हे प्रकरण सोनी शेट्टी नावाच्या पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आले. तिने एजंटवर दबाव आणून पीडितेला एका दिवसात परत आणून तिच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केले." 


हे ही वाचा: पाकिस्तान ऐकायला तयार नाही, चॅम्पियन्स ट्रॉफीवर सुरू झालं नवीन 'नाटक'! ICC समोर ठेवली 'ही' अट


सोनाने सांगितली सगळी आपबिती  


सोनाने सांगितले की, दुबईला पोहोचल्यावर एक महिला आणि एक पुरुष तिला घ्यायला आले. त्यांनी गाडीतच तिचे मंगळसूत्र कडून घेतले. यानंतर ते तिला  एका बारमध्ये घेऊन गेले. एका खोलीत डांबून ठेवले. दुसऱ्या दिवशी जेव्हा तिला शोसाठी म्हणून सांगून  तिला एका क्लबमध्ये डान्स करायला घेऊन गेले. हा सर्व प्रकार तिने एजंटशी आणि पतीला सांगितला. पुढे तिने सांगितले की,  तिला दुबईत एका खोलीत बंद करून ठेवले होते. त्याला फक्त एक वेळ जेवायला दिले जात होते. जेव्हा तिने  भारतात परत येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले तेव्हा तिला दुबईला आणण्यासाठी सहा-सात लाख रुपये खर्च झाल्याचे त्या लोंकानी सांगितले. पुन्हा परत जाण्यासाठी ते किमान अडीच लाख रुपयांची मागणी करत होते. तिला तिथेच पाच-सहा दिवस कैदेत ठेवले. यादरम्यान वेगवेगळे लोक येऊन अत्याचार करत असल्याचेही तिने सांगितले.


हे ही वाचा: धार्मिकतेच्या नावाखाली अभिनेत्रीने गिळले प्राणघातक बेडकाचे विष, तडफडून झाला मृत्यू


दुबईत काय होणार आहे हे एजंटला नव्हते माहीत


या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, सोनाला पाठवणाऱ्या एजंटलाही दुबईत काय होणार आहे याची माहिती नव्हती. एजंटची त्याची कोणतीही चूक नसल्याचे सांगितल.  परंतु कोणतेही रॅकेट आढळल्यास तपास केला जाईल असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.