अनेकवर्ष लोकोपायलट म्हणून काम केलं, पण त्याच लोकलखाली जीव दिला... कारण
मुंबईत धक्कादायक घटना समोर आली आहे. आयुष्यभर ज्या रेल्वे लोकलची सेवा केली त्याच लोकलखाली लोकोपायलटने आत्महत्या केली.
Mumbai Loco Pilot Suicide : मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर (Western Railway) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या लोकलमध्ये लोकोपायलट (Loco Pilot) म्हणून अनेक वर्ष काम केलं. त्याच लोकलखाली (Mumbai Local) जीव (Suicide) दिला. पश्चिम रेल्वे मार्गावच्या विले पार्ले रेल्वे स्टेशनवरची (Vile Parle Railway Station) ही घटना आहे. राकेश कुमार गौड असं मृत लोको पायलटचं नाव होतं. ते 57 वर्षांचे होते. मंगळवारी राकेश कुमार यांनी विले पार्ले रेल्वे स्टेशनवर लोकलखाली उडी मारत आत्महत्या केली. रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या सीसीटीव्ही (CCTV) अपघाताची दुश्य कैद झाली आहे.
मृत राकेश कुमार गौड यांच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुली आहेत. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मित मृत्यूची नोंद केली असून राकेश कुमार गौड यांनी टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुंबईच्या सीएची नाशिकमध्ये आत्महत्या
दरम्यान मुंबईच्या (Mumbai) एका चार्टर्ड अकाऊंटंटने (CA) नाशिक (Nashik) जिल्ह्यात आपल्या मित्राच्या रिसॉर्टमध्ये आत्महत्या केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. सीए चिराग वरैया असं आत्महत्या करणाऱ्या सीएचं नाव आहे. चिराग यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली असून आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये असं त्यांनी लिहिलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपूरी इथं हे रिसॉर्ट असून रिसॉर्टच्या केअरटेकरने सोमवारी रात्री चिराग वरैया यांचा मृतदेह पाहिला त्यानंतर त्यांनी पोलिसांनी माहिती दिली.
हे ही वाचा : Pune Crime : कोयता गँगला पकडा, बक्षीस मिळवा... पुणे पोलिसांकडून बक्षिसांची खैरात
बलात्काराचा होता आरोप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिराग यांच्यावर बलात्काराचा आरोपाखाली तक्रार दाखल झाली होती. 10 जानेवारीला त्यांच्याविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर तपासात ते पोलिसांनाही सहकार्यही करत होते. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी हे आत्महत्येचं प्रकरण असल्याचं म्हटलं आहे.
हे ही वाचा : हातावर What to do? लिहित विद्यार्थ्याची आत्महत्या, धक्कादायक कारण समोर
डहाणूत विद्यार्थ्याची आत्महत्या
डहाणू (Dahanu) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या तलासरीतील ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक आश्रम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झरी इथं अॅलेस विनय लखन नावाच्या विद्यार्थ्याने बाथरूममध्येच गळफास घेऊन आत्महत्या (Student Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . अॅलेस हा मुळचा तलासरी तालुक्यातील सावरोळी उधानपाडा इथला राहाणार आहे. पोलिसांना अॅलेसच्या हातावर अॅलेस डेथ असं लिहिलेलं आढळलं, तसंच व्हॉट आय डू? असंही त्याच्या हातावर लिहिलं होतं. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत प्रेमप्रकरणातून अॅलेसने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.