मुंबई : सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरस व संचारबंदीत हातावर थुंकून हस्तांदोलन करण्याचा व्हिडीओ बनवून टिकटॉकवर अपलोड करणाऱ्या शादाब खान व इरफान खान या दोन टिकटॉक स्टारवर मीरारोडच्या नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..या दोघांनी टिकटॉक व्हिडिओत मुलीने कानशिलात लगावल्याच्या रागातून हातावर थुंकून माफी मागण्याच्या बहाण्याने सदर मुलीशी हस्तांदोलन करतानाचा व्हिडीओ तयार केला होता.. हा व्हिडीओ टिकटॉकवर वायरल होताच नयानगर पोलिसांनी मास्क न लावता कोरोना वायरसचा फैलाव करणाऱ्या या दोन टिकटॉक स्टारवर मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊनच्या काळात सर्वच तरूण टिकटॉकवर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहे. परंतु सध्या टिटिकटॉकचा गैरवापर होताना देखील दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भावर पाहता दोशात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु तरूण मुलं लॉकडाऊनचे मोडताना दिसत आहेत. 


लॉकडाऊनच्या काळात सरकारने काही नियम शिथिल केले आहेत. याचा अर्थ असा नाही की, संकट गेले आहे. या परिस्थितीतही नागरिकांनी काळजी घ्यावी आणि घरीच राहावे.