Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी(Governor Bhagat Singh Koshyari) यांनी शिवाजी महारांजाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्य त्यांना चांगलेच महागात पडणार आहे. राज्यपालांना याप्रकरणी कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे. महाराष्ट्राचे राज्यापाल भगतसिंह कोशयारी आणि भाजपा खासदार  सुधांशू त्रिवेदी  विरोधात मुंबई उच्च न्यायालयात  फौजदारी रिट याचिका दाखल झाली आहे. यामुळे राज्यपालांच्या अडचणात वाढ होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचिकाकर्ता रमा अरविंद  यांच्या वतीने वकिल अमित कटारनवरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्राचे राज्यापाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा खासदार  सुधांशू त्रिवेदी  विरोधात मुंबई उच्च न्यायालयात ही फौजदारी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. 


छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि मराठी माणसाचा अवमान केल्या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे. अनुसूचित जाती, जनजाती प्रतिबंधक अधिनियम 2015 ( सुधारित) कलम 3 (1)(v)  अन्वये ही याचिका दाखल करण्यात आली आहे 


महाराष्ट्रचे राज्यापाल आणि भाजपा खासदार सुधानशू त्रिवेदी यांनी केलेल्या विधानामुळे अनुसूचित जाती सोबतच सर्वसामान्य लोकांची भावना दुखावल्या असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. लवकरच या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. 


राज्यापाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा खासदार  सुधांशू त्रिवेदी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश कोर्टाने द्यावेत तसेच या दोघांविरोधात ऐट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा असा दोन प्रमुख मागण्या या याचिकेद्वाऱ्या करण्यात आल्या आहेत. 


दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले(Udayanraje Bhosale) यांनी देखील राज्यपालांच्या वक्तव्याचा संताप व्यक्त केला आहे. महापुरूषांचा अपमान करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे असे म्हणत  उदयनराजेंनी अशा प्रकारची वक्तव्य करणाऱ्यांविरोधात थेट देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.