मुंबईतही गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मंदिरामध्ये भाविकांची गर्दी
आज गुरुपौर्णिमा, आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढी पौर्णिमा ही गुरपौर्णिमा म्हणून साजरी करण्यात येते. श्री साईबाबांच्या हयातीत या दिवसाला फार मोठे महत्व होते. त्यामुळेच आजही या दिवसाला फार महत्वाचे स्थान आहे.
मुंबई : आज गुरुपौर्णिमा, आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढी पौर्णिमा ही गुरपौर्णिमा म्हणून साजरी करण्यात येते. श्री साईबाबांच्या हयातीत या दिवसाला फार मोठे महत्व होते. त्यामुळेच आजही या दिवसाला फार महत्वाचे स्थान आहे.
मुंबईतही आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने भक्तांचा उत्साह दिसून येतो आहे. अनेक साईमंदिरे, दत्तमंदिरे त्याचप्रमाणे स्वामीं समर्थ यांच्या मठातही दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. दादरच्या श्री स्वामी समर्थमठा बाहेर भाविकांनी दर्शनासाठी लांब रांगा लावल्या आहेत.
श्री साईबाबांवर श्रद्धा असणारे लाखो भक्त गुरुपौर्णिमेला शिर्डीला येऊन साईंच्या समाधीचे दर्शन घेतात. आज पहाटेपासून गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याला सुरुवात झाली. सकाळी साडेचार वाजल्यापासून साईंच्या दर्शनाला भाविकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे.