कल्याण :  कोरोनाचा सामना करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने डॉक्टर, नर्सची आणि वॉर्डबॉयची भरती प्रक्रिया सुरु केली आहे. या पूर्वी तीन टप्पे भरतीचे झाले आहे. आज चौथ्या टप्प्यात 80 वॉर्डबॉयच्या जागासाठी महापालिकेने ऑनलाईन जाहिरात दिली आहे. या जाहिरातीला चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यभरातून हजारो तरुण भरतीसाठी आले. त्यामुळे येथे मोठी गर्दी झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जवळपास दीड हजार पेक्षा जास्त तरुणांनी केडीएमसी मुख्यालयात गर्दी केली आहे. या भरती प्रक्रियेच्या वेळी नियोजना अभावी सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला. त्यामुळे भरती होण्याआधी या बेरोजगार तरुणांना कोरोनाची लागण होण्याची भीती व्यक्त होत आहे.


कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. कल्याण-डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात मुंबईला जाणारा कर्मचारी वर्ग आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढछ आहे. त्यातच आता १२ जुलैपर्यंत कल्याण-डोंबिवलीत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.