सीआरझेड नियमात बदल, मुंबईत काही इमारतींचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
मुंबईतील काही इमारतींच्या पुनर्विकासाला याची मदत होणार आहे.
मुंबई : सीआरझेडच्या नियमामध्ये बदल करून आता सागरी किनाऱ्यापासून बांधकामावरची बंदीची मर्यादा 500 मीटर वरून, 50 मीटरवर आणण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं मंजूर केला आहे. अधिसूचना पर्यटन मंत्रालायाच्या वेबसाईटवर टाकण्यात आली आहे. त्यावर पुढच्या 60 दिवसात सूचना मागवण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे त्यामुळे महाराष्ट्राला विशेषतः कोकणच्या शेकडो किलोमीटरच्या किनारपट्टीवर राहणाऱ्या जनतेला मोठा दिलासा मिळाणार आहे. मुंबई नव्या मर्यादेमुळे किनापट्टीवरच्या शेकडो जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग यामुळे मोकळा होणार आहे.
मुंबईतच 62 किलोमीटरची किनारपट्टी
एकट्या मुंबईतच 62 किलोमीटरची किनारपट्टी आहे. सीआरझेडची मर्यादा कमी झाल्यानं आता किमान 2 हजार इमारतींचा पुनर्विकास शक्य होईल. तर डागडुजी अभावी जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या अनेक कोकणवासियांना आपल्या घरांची बांधकामं करणं शक्य होणार आहे. दुसरीकडे या निर्णयाचा फायदा बिल्डर लॉबीला होण्याची भीती पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे.